अमेरिकेप्रमाणे भारतात बँका दिवाळखोर झाल्या तर ग्राहकांच्या पैशांच काय होईल?
अमेरिकेत 2 मोठ्या बँक दिवाळखोर झाल्या आहेत.
जर भारतात बँका दिवाळखोर झाल्या तर ग्राहकांचा पैसा अमेरिकेपेक्षा जास्त सुरक्षित राहील.
भारतात ग्राहकांचा पैसा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमांअंतर्गत सुरक्षित आहे.
2020 मध्ये भारत सरकारने DICGC च्या नियमांमध्ये बदल केला होता.
DICGC च्या नियमांअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत बँकांकडून गॅरंटी मिळते.
जर तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसा जमा केला तेव्हाही 5 लाखांचीच गॅरंटी मिळते.
हा पैसा बँका बुडण्याच्या 90 दिवसांच्या आत मिळतो.
एसबीआयच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या तुलनेत भारतीय टॉप-10 बँकांमध्ये 98% पेक्षा जास्त पैसा सेफ आहे.