आधारमध्ये किती वेळा बदलता येतं नाव?

आधार कार्ड भारतात ओळखीसाठीचं सर्वात मोठं डॉक्यूमेंट आहे.

हे तयार करताना अनेकदा यामध्ये चुकीची माहिती टाकली जाते.

मात्र चुकीची माहिती तुम्ही नंतर सुधारु शकता.

तुम्ही आधारवर जन्म तारीख किंवा पत्ता किती वेळा बदलू शकता याविषयी माहितीये का?

नावाविषयी बोलायचे झाल्यास स्पेलिंग चूक झाल्यास 2 वेळा बदलली जाऊ शकते.

लग्नानंतर महिला आपलं अडनाव बदलतात.

जर जेंडर (लिंग) मध्ये चूक झाली तर एकदाच बदलता येते.

जन्मतारीख अपडेट करण्यासाठीही फक्त एक चान्स मिळतो.

तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अपडेट करु शकता.