महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार
नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
धनगर समाजाला 1000 कोटी रुपये महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
हर घर जल: जनजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद पाण्यासोबत स्वच्छताही...
5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0
‘लेक लाडकी’ योजना
- पिवळ्या, केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना लाभ
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
सारे काही महिलांसाठी... महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
सर्वांसाठी घरे... यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
रस्त्यांसाठी निधी...आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटीमेट्रो प्रकल्प....रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरणविमानतळांचा विकास...
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ