31 मार्चपूर्वी करुन घ्या 'ही' कामं, अन्यथा...

आणखी पाहा...!

आर्थिक दृष्टिकोनातून मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. 

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला अनेक कामे मार्गी लावावी लागतील.

ही कामं केली नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. 

आर्थिक कामांची अंतिम मुदत 31 मार्च 2023 रोजी संपतेय.

तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी करा. नंतर तुमचे पॅन कार्ड अवैध होईल.

ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करा, ही योजना 31 मार्च 2023 पर्यंतच लागू आहे

टॅक्स प्लानिंग केली नसेल, तर ही शेवटची संधी आहे. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, ELSS मध्ये गुंतवणूक करु शकता.

जास्त प्रीमियमसह LIC पॉलिसीवरही टॅक्स सूट हवी असल्यास  31 मार्च 2023 डेडलाइन आहे. 

FD नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल तर लवकर करा, अन्यथा म्युच्युअल फंड अकाउंट फ्रीज केले जाईल.