नागपुरातील दोन भावंडांना नोकरी मिळाली नसल्याचे चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. 

इंजिनियरिंग ड्राॅप आऊट असं हॉटेलचं नाव असून हे नाव पाहून रस्त्याने येजा करणारे आकर्षित होतात.

 नागपुरातील राकेश नानवटकरचे बजाज नगर चौकातील हमरस्त्यावर इंजिनियरिंग ड्रॉप आऊट हॉटेल आहे.

कुल्लड टी, कुल्लड कॉफी, कुल्लड पिझ्झा कुल्लड बर्गर असे 60 पेक्षा अधिक पदार्थ हॉटेलात तयार होतात.

60 हजारांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. 

अल्पावधीतच येथील पदार्थांचे अनेकांनी कौतुक केले या व्यवसायातून राकेशला चांगली कमाई होत आहे.

कुठली लाज न बाळगता तरुणांनी व्यवसाय करायला हवा असे अतुल नानवटकर सांगतो.