आधार केंद्रावर जास्त पैसे मागताय? अशी करा तक्रार

सरकारी कामांपासून ते कोणत्याही ठिकाणी आपल्याला आधार कार्डची गरज पडते.

यामुळेच आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं असतं.

अशा वेळी एखादा अधिकारी तुमच्याकडून अपडेशनच्या ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मागत असेल तर तक्रार करता येते.

जर तुम्हाला तमची आधार नोंदणी करायची असेल तर कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत.

बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतात.

लहान मुलांच्या बायोमेट्रिक अपडेशनसाठी कोणतेही चार्ज लागत नाहीत.

तुम्ही तुमच्या आधारमध्ये नाव, जन्म तारीख, पत्ता किंवा लिंग बदलत असाल. तर 50 रु. लागतात.

जास्त फिस मागितल्यावर तुम्ही 1947 नंबरवर अधिकाऱ्यांची तक्रार करु शकता.

 तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/file-complaint लिंकवर तक्रार करु शकता.