ट्विटरवर खूप सक्रिय असलेले उद्योगपती आनंद महिंद्रा सामान्य लोकांशी संबंधित त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात.
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख असलेले आनंद महिंद्रा देशातील सर्वात प्रतिष्ठित टॉप 10 औद्योगिक घराण्यांपैकी एक आहेत.
महिंद्रा यांचा जन्म 1 मे 1955 रोजी मुंबई (पूर्वी बॉम्बे) येथे झाला.
आनंद यांनी 1977 मध्ये हार्वर्ड कॉलेज, यूएसएच्या व्हिज्युअल आणि पर्यावरणीय अभ्यास विभागातून पदवी प्राप्त केली.
त्यानंतर बोस्टनमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते देशात परतले.
त्यांनी महिंद्रा युजीन स्टील कंपनीमध्ये छोट्या पदावरून काम करण्यास सुरुवात केली.
10 वर्षानंतर ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे उपव्यवस्थापकीय संचालक झाले.
महिंद्रा समूह 100 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.
या व्यतिरिक्त आनंद महिंद्रा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विट्ससाठी देखील प्रसिद्ध आहेत.
आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना गाड्या गिफ्ट केल्या तर काहींना नोकऱ्या.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर ते नेहमी बोलत असतात.