अजित पवारांची एकूण संपत्ती किती?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कायम चर्चेत असतात, सध्या ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत.
आज आपण त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत.
अजित पवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 74 कोटी, 42 लाखांची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवार यांच्यापेक्षा त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे अधिक संपत्ती असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अजित पवार यांच्या नावे दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे, होंडा एकोर्ड अशा तीन गाड्या ही वाहने आहेत.
अजित पवारांच्या नावावर असलेल्या एकूण वाहनांची किंमत 89 लाख रुपये इतकी आहे.
तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक इनोवा क्रिस्टा ही कार आणि एक ट्रॅक्टर आहे.
) अजित पवारांकडे 13 लाख 90 हजारांचे तर त्यांच्या पत्नीकडे 61 लाख 56 हजारांचे दागिने आहेत.
अजित पवारांकडे शेत जमीन आणि बिगर शेतजमीन मिळून एकूण 50 कोटींपेक्षा अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता आहे.