शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
धनुष्यबाण आणि मशाल या नंतर आलेल्या गोष्टी. पहिली आली ती शिवसेना. शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी, माझ्या आजोबांनी दिलंय.
ठाकरे इर्शाळवाडी दुर्घटना लाजीरवाणी असं म्हणाले कारण, तेथील एक तरुणाने प्रश्न विचारला की, ‘आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का?’
एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. कुणाला मुजरा मारताय? कशासाठी मुजरा मारताय?
समृद्धी महामार्गावर अपघातातील मृतांच्या चिता धगधगत असताना इथे शपथविधी झालाय.
गद्दारांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत.
शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षात मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतेय. ही माझी कमाई आहे.
शिवसेनेने खंजीर खुपसला म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलंत?
तुम्हाला बारीक सारीक गोष्टींसाठी दिल्लीत येरझारा घालाव्या लागत असतील तर इथे सरकार असले काय नसले काय?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हेच सांगेन की, या शुभेच्छा केवळ माझ्या नाहीत तर तमाम जनतेच्या म्हणून देतोय. त्या तुम्ही सत्कारणी लावा.
या देशावर जो प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नाही.
अजितदादांबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
Click Here या देशावर जो प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नाही.