..ती 21 वर्ष, शिवसेना आणि उद्धव ठाकरे!

Heading 3

2002 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुंबई महापालिकेमध्ये विजय झाला. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेनेची ही पहिलीच निवडणूक होती.

2003 साली महाबळेश्वर अधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

यानंतर लगेचच 2005 सालीच राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली, ज्यामुळे ठाकरे कुटुंबामध्ये फूट पडली.

2009 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचा दारूण पराभव झाला. 

2012 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. 

2014 साली शिवसेना-भाजप यांच्यात दीर्घकाळ असलेली युती तुटली.

विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने ठाकरेंच्या नेतृत्वात 63 आमदार निवडून आणले.

स्वबळावर निवडणुका लढवल्यानंतर शिवसेना भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाली. 

2019 साली भाजपसोबत युती करून शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले.

सत्तेतल्या वाट्यावरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली

2019 ते 2022 या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 

2022 साली शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरही दावा केला. निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंची असल्याचा निवाडा दिला.

निवडणूक आयोगाच्या निकालामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह मिळालं.

उद्धव ठाकरे यांना आता मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे.