बारामती ते दिल्ली..सुप्रिया सुळेंचा प्रवास

सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 रोजी पुणे येथे झाला, त्यांचं शिक्षण जय हिंद कॉलेज मुंबईमध्ये झालं

सुप्रिया सुळे यांचा विवाह 4 मार्च 1991 रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी झाला

त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

सुप्रिया सुळे यांची 2006 मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली

त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पंधरावी लोकसभा निवडणूक जिंकली.

2018 मध्ये लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून त्यांची निवड झाली

सुप्रिया सुळे यांचा सलग सात वर्षे संसद रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे या यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेच्या कार्याध्यक्ष देखील आहेत.

नुकतीच त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष  म्हणून निवड करण्यात आली आहे.