अजितदादांबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 साली झाला. सर्वाधिक 5 वेळा उपमुख्यमंत्री व्हायचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.
ते विरोधी पक्षनेत्यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले आहेत.
1991 सालापासून ते बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
अजित पवारांचं मूळ गाव बारामतीमधलं काटेवाडी आहे, मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथे झाला.
अजितदादांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बारामतीमध्ये झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले.
शिक्षण पूर्ण करून अजित पवार बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांची राजकारणात एण्ट्री झाली.
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी 1991 साली त्यांची निवड झाली, 16 वर्ष ते त्या पदावर होते.
ते जून 1991 ते सप्टेंबर 1991 या काळात लोकसभेचे सदस्य देखील होते.
अजित पवार हे 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग सहावेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत.