राज्यात पावसाचा हाहाकार

पावसाचं आगमन झालं असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. 

राज्यभरात अनेक ठिकाणी धो धो पाऊस कोसळत आहे. 

पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. 

मुसळधार पावसाचं पाणी साटल्यामुळे धरणांचेही दरवाजे उघडावे लागले आहेत. 

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत रेड, यलो ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

महाराष्टात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांची कोंडी होतेय.

अनेक ठिकाणीचे रस्ते पाण्याने भरले असून ट्रेनही रद्द होत आहेत.