समृद्धी महामार्गावर काही वाहनचालक वेग मर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत.

 गाडीमधील बारीक बाबींकडे दुर्लक्ष केल्यानं अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.

आतापर्यंत  30 हून अधिक अपघात तर काही वाहनांनी पेट घेतल्याचा घटना घडल्या आहेत. 

 महामार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 गाडीचे टायरयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहेत. टायरमध्ये नायट्रोजन हवा भरल्यास उत्तम आहे.

 नायट्रोजन हवा थंडीमध्ये कमी होत नाही आणि उन्हाळ्यात वाढतही नाही. 

गाडीची फिटनेस,व्हील अलाइनमेंट, ब्रेक सिस्टम, पावर स्टेरिंग तपासणे आवश्यक आहे.

लहान गाड्यांनी ओवर स्पीड करत गाडी 120 हून अधिक वेगात चालवणे टाळले पाहिजे. 

टायरवर कुठली भेग असल्यास टायर फाटून अपघात होण्याच्या शक्यता जास्त असतात असते.

वाहनाबाबतची माहिती नागपूरचे ऑटोमोबाईल इंजिनिअर निखिल उंबरकर यांनी दिली.