चेंबूर रस्ता खचला, 50 गाड्या खड्ड्यात

चेंबुरमध्ये बिल्डिंग समोरील रस्ता खचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर येथील एसआरए इमारतीसमोरील रस्ता खचला आहे.

खचलेल्या खड्ड्यात 40-50 वाहनं पडल्याचं समोर येत आहे.

चुनाभट्टीमध्ये जमीन खचली आहे.

चुनाभट्टीमध्ये जमीन खचली असून या खड्ड्यात गाड्या कोसळत आहेत.

चार चाकी या खचलेल्या रस्त्यात घसरत जाताना Video समोर आलाय.

आजुबाजूच्या बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढून बिल्डिंग रिकाम्या करण्यात आल्या आहेत.

घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत.

रहदारीचा रस्ता खचल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे.