निसर्गाच्या खुशीत वसलेलं इर्शाळवाडी आज नाहीसं झालंय.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली इर्शाळवाडीमध्ये 20 ते 30 घरांची ही वस्ती
इर्शाळवाडी ही इर्शाळगडामुळेच प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथं पर्यटनासाठी गर्दी असते.
इर्शाळगडावर आकर्षण म्हणजे नैसर्गिक छिद्र, ज्याला मराठी नेढे किंवा इंग्रजीत ‘नीडल्स आय’ असंही म्हणतात.
गडाच्या अगदी पायथ्याशी इर्शाळवाडी वसलेली आहे
(फोटो- सौजन्य: स्वप्निल पवार, रानवाटा)
या वाडीमध्ये आजपर्यंत कोणतीही गाडी पोहोचेल असा रस्ता नाही
मोकळा असा निसर्ग लाभलेला असल्यामुळे वाडीतले लोक इथं निवांत होती.
इर्शाळवाडीमध्ये कौलारू आणि मातीची घरं सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
(फोटो- सौजन्य: स्वप्निल पवार, रानवाटा)
वाडीला लागूनच अनेकांची छोटेखानी शेती आहे, त्यातच थोडंफार काही पिकवून पोट भरत होती.
पण बुधवारी, रात्री गाढ झोपेत असलेल्या या गावावर दरड कोसळली
या घटनेत आतापर्यंत 16 मृतदेह सापडले असून मदतकार्य सुरू आहे.