निसर्गसंपन्नतेने नटलेल्या शहापूर तालुक्याला दारिद्र, मागासलेपणाचा शाप आहे.

Heading 3

आत्तापर्यंत अनेकांनी तालुक्याचं, मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला. पण इथले प्रश्न अद्यापही सुटले नाही. 

Heading 3

अद्यापही या आदिवासी पाड्याने वीज पाहिली नाही. अनेक वर्षानंतरही इथल्या समस्या आजही कायम आहेत.

Heading 3

माहुली किल्ल्याच्या जवळ पिवळी ग्रामपंचायतीमध्ये रताळे पाडा आहे. येथील प्रत्येक घरातील मुल शाळेत जातं.

Heading 3

रताळेपाड्यात 1 ते 4थी पर्यंतची शाळा भरते तर पिवळी पाड्यावर 5 ते 12 पर्यंतचे वर्ग भरतात.

Heading 3

पावसाळ्यात विद्यार्थ्यांचं अनेकदा नुकसान होतं. कारण या दोन्ही पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नाही. 

Heading 3

त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना लाकडी साकवावारून शाळेत जावं लागतं. यापूर्वी 2 वेळा हा साकव वाहूनही गेला होता. 

Heading 3

विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी स्वत:च श्रमदानातून साकव तयार केला. 

Heading 3

जास्तच जोरदार पाऊस झाला तर साकव पाण्याखाली बुडून जातो आणि विद्यार्थ्याची शाळा बुडते. 

Heading 3

या पावसामुळे विद्यार्थ्यांची शाळा किती दिवस बुडेल या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी विद्यार्थ्यांकडे नाहीये. 

Heading 3

त्यामुळे या पाड्यांमध्ये किमान सोयी सुविधा पुरवण्यास प्राधान्य द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीये.

Heading 3