राज ठाकरेंच्या कारमध्ये का असतो बिस्किटांचा डब्बा?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही.
संभाषण कौशल्य, उत्तम व्यंगचित्रकार असे अनेक पैलु राज ठाकरेंचे आपण पाहिले असतील.
पण त्यांचं श्वान प्रेमही तितकं सर्वश्रृत आहे. ते श्वानांना आपल्या घरातील सदस्य प्रमाणे वागवतात
त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीची अनेक श्वान आहे.
पण त्यांचा लाडका होता तो ग्रेट डेन जातीचा जेम्स.
राज यांच्या जुन्या आणि नवी घरी श्वानांसाठी खास अशी जागा आहे.
29 जानेवारी 2021 रोजी राज ठाकरेंचा जेम्स नावाचा ग्रेट डेन जातीचा श्वानाचा मृत्यू झाला.
लाडाच्या जेम्सवर अंत्यसंस्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी राज ठाकरे हे भावुक झाले होते.
मधल्या काळात शर्मिला ठाकरे यांच्यावर एका बॉन्ड नावाचे श्वानाने हल्लाही केला होता. त्यांना 65 टाके पडले होते.
त्यानंतर राज यांनी सर्व श्वानांना कर्जत येथील फॉर्म हाऊसवर पाठवलं होतं.
राज ठाकरेंच्या लाडक्या जेम्स आणि बाँडचं रेम्बो हे पिल्लु आमदार राजू पाटील यांच्याकडे आहे.
ग्रेट डेन जातीचे जेम्स आणि बॉण्ड राज ठाकरेंचे अतिशय लाडके होते.
रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डब्बा असतो.