मुलींना शिकण्यासाठी उभारला राजवाडा!

आणखी पाहा...!

महाराष्ट्राच्या इतिहासाचा विसर पडू नये म्हणून चक्क शाळेचा राजवाडा बनवला आहे.

सांगली जिल्ह्यातील समडोळी जि. प. मुलींच्या शाळेचं रूपडंच पालटलंय. 

रूपडं पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.

जुन्या वाड्यात भरणाऱ्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रूप दिले आहे.

शिक्षक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत शाळेचा लूक बदलला. 

मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांनी भिंतीवर चित्रे साकारली.

चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला आहे. 

भिंतींवर शस्त्रे, महापुरूषांची माहिती देणारी ऐतिहासिक चित्रे रेखाटली आहेत. 

भिंतींवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांची चित्रे रेखाटली.

भिंंतींवरील त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.

भिंतींवरील चित्रातून विद्यार्थ्यांना वैचारिक चालना दिली आहे.

शाळेतील प्रत्येक वर्गात ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड आहे.

शालेय विद्यार्थिनींना प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. 

मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण दिले जात आहे.