टोमॅटो नव्हे तर या शेतीच्या माध्यमातून तरुण कमावतोय लाखो रुपये

बिहारमधील एक तरुण कोचिंगमधून सुट्टी घेऊन आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊन शेतीची कल्पना शिकून घरी आला. 

यानंतर त्याने शिक्षण सोडून परवलची शेती करण्याकडेच पूर्ण लक्ष दिले. 

याव्यतिरिक्त किती दिवसात कोणत्या प्रकारचे उत्पादन चांगले होते, हे सर्व तो शिकला. 

रामउदागर याने कोचिंगला जाणे बंद केले आणि एक कट्ठामध्ये परवलची शेती तो करू लागला.

एका वर्षात त्याला या माध्यमतातून 65 हजार रुपयांची कमाई झाली. 

सध्या तो 2 एकरमध्ये परवलची शेती करत आहे. 

ही शेती करायला त्याला जवळपास 4 लाख रुपये लागतात.

बाजारमूल्य पाहिले असता, 30 रुपयांपासून लग्नाच्या दिवसात त्याला 90 रुपये किलोपर्यंत भाव मिळतो. 

सर्व खर्च काढून त्याला वर्षाला 5 ते 6 लाख रुपये कमाई होते, असे तो सांगतो.