याठिकाणी मिळतात अर्ध्या किमतीत पुस्तके

लखनऊ येथील अमीनाबाद बुक मार्केट हे विद्यार्थ्यांसाठी वरदान असल्याचे सिद्ध होत आहे. 

इथे तुम्ही आपली वापरात नसलेली पुस्तकेसुद्धा विकू शकतात.

इथे नववीच्या वर्गापासून ते स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांपर्यंत सेकंड हँड आणि भाड्याने मिळतात. 

किती टक्के सूट द्यावी, हे पुस्तकाच्या क्विलिटीवर ठरते. यासोबत पुस्तकाच्या बदल्यात पुस्तक अशीही सुविधा आहे. 

या बाजारात लहान पुस्तकांपासून ते रेल्वे, एसएससी, बँकिंग, जेपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व पुस्तके मिळतात. 

ज्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आता बंद झाल्या आहेत, ती सर्व पुस्तके याठिकाणी मिळतात. 

विद्यार्थ्यांना इथे चांगल्या स्थितीत आणि स्वस्त किंमतीची पुस्तके सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. 

याठिकाणच्या पुस्तक बाजाराला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

तुम्हालाही अशी पुस्तके हवी असतील तर तुम्ही याठिकाणी भेट देऊ शकतात.