सध्या आरोग्यदायी जीवनासाठी मोठ्या संख्येने लोक योगा प्राणायामाकडे वळत आहेत.
जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने वर्धा येथील 63 वर्षीय आजोबांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
अनंत विठ्ठलराव टिकले यांना दोन हार्ट अटॅक आले आणि त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
योगा प्राणायामामुळे आता ठणठणीत असल्याचं अनंत टिकले सांगतात.
टिकले हे वर्धा जिल्हा परिषद कृषी विभाग येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.
हृदयरोग झाल्यानंतर टिकले हे योगा प्राणायामाच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवतात.
भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायम, उज्जई प्राणायम, अनुलोम विलोम, भ्रमरी, ध्यान ते रोज करतात.
आता विविध ठिकाणी कार्यक्रमात सहभागी होऊन योगा प्राणायामाबद्दल ते जनजागृती करत असतात.
हृदयरोगाशी संबंधित रुग्णांनी कोणता व्यायाम योगा किंवा प्राणायाम करावा याबद्दल ते माहिती देतात.
वर्धा जिल्ह्यात आता योगा मार्गदर्शक म्हणून अनंत टिकले यांची ओळख आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!
Click Here