सारोळा कासारच्या मातीत कुस्त्यांचा थरार

आणखी पाहा...!

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील गाव खेड्यांत यात्रांचा हंगाम सुरू होतो.

गावच्या यात्रा आणि तमाशा, कुस्तीचा फड हे समीकरणच आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातही यात्रेनिमित्त कुस्तीची मैदाने होतात. 

सारोळा कासार येथे निर्गुणशहावली बाबाची यात्रा झाली.

यात्रेतील कुस्तीच्या आखाड्यात तब्बल दीडशे मल्ल उतरले.

मानाच्या पहिल्या कुस्तीला 2 लाख 11 हजारांचे बक्षीस होते. 

मानाच्या कुस्तीत युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसेने बाजी मारली. 

उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवडला त्याने आस्मान दाखवले. 

सारोळा कासार येथे 7 तास कुस्त्यांचा थरार सुरू होता. 

विविध वजन गटात एकूण 75 कुस्त्या झाल्या.

कुस्तीचा थरार पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती.