फेमस सोलापूरची बाजार आमटी! 

कधी शहराचं तर कधी गाजलेल्या शेफचं नाव एखाद्या डिशला मिळतं. 

सोलापूर शहरातील तर अनेक डिश या फेमस आहेत.

 वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत असलेल्या या शहराची खाद्यसंस्कृतीही श्रीमंत आहे.

सोलापूरची बाजार आमटी ही गेल्या कित्येक दशकांपासून फेमस आहे.

काय आहे ही बाजार आमटी? हे नाव का पडलं? सोलापूरमधील महावीर प्युअर व्हेज बाजार आमटीचे मालक प्रद्युम्न पुरवत यांनी माहिती दिली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील करकंब हे बाजार आमटीचं उगमस्थान आहे. 

सोलापूरमध्ये यापूर्वीपासूनच बाहेरच्या गावातील व्यापारी बाजारासाठी येतात.

खाण्यासाठी काही तरी बनववावं, या उद्देशानं ते चार-ते पाच डाळी एकत्र करुन आमटी बनवत असतं. 

 आमटीची चव भन्नाट आहे. त्यामुळे ती अगदी कमी कालावधीमध्ये बाजारात फेमस झाली. 

 याच कारणामुळे त्याचे नाव बाजार आमटी असं पडलं.

कडक भाकरीसोबत ही आमटी खायला भन्नाट लागते.