सांगलीत रंगणार 'महिला महाराष्ट्र केसरी'चा थरार 

महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ म्हणजे कुस्ती होय. 

 नुकताच पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार झाला. 

आता महिलांचीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. 

 सांगलीत23 आणि 24 मार्चला होणाऱ्या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. 

सांगली जिल्ह्यााला पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. 

 त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. 

पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्यातच खेचून आणण्यासाठी कुस्तीपटू तयारीला लागल्या आहेत. 

 तर प्रशिक्षक उत्तमराव पाटील मुलींचा कसून सराव घेत आहेत.