लातूरमध्ये कचरा उचलण्यासाठी अनोखा प्रयोग

कचरा वेचक कष्टकरी समाज हा विस्थापित जीवन जगणारा वंचित घटक आहे. 

लातूर महानगरपालिका व जनाधार सेवाभावी संस्था यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे.

लातूर शहरातील कचरा ई-व्हेईकल द्वारे उचलला जात आहे. 

भारतामधील हा पहिला प्रयोग लातूर शहरामध्ये राबविला जात आहे. 

सध्या प्रायोगिक तत्त्वावर 17 ई व्हेईकलद्वारे शहरातील कचरा उचलला जात आहे.

ई-व्हेईकलमधून कचरा गोळा करण्याचे काम महिला करत आहेत. 

कचरा वेचक महिलांच्या आर्थिक उत्पन्नात तिपटीने वाढ झाली आहे. 

एक महिला कर्मचारी दिवसात 500 घरातील कचऱ्याचे संकलन करते. 

भविष्यामध्ये 250 ई-रिक्षांचा वापर केला जाणार असल्याची माहिती शरयू भारतीय यांनी दिली.

देशभरात स्वरूपाचे प्रकल्प चालू झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

लातूरचा हा प्रकल्प देशातील इतर महापालिकांसाठी आदर्श आहे.