'या' महिला बनवतात 21 प्रकारच्या शेवया!

ग्रामीण भागातील महिला विविध योजनांचा लाभ घेत व्यवसायात भरारी घेत आहेत.

धाराशिव जिल्ह्यातल्या गुंजोटी गावातील महिलांनी 21 प्रकारच्या शेवया तयार करून विक्रीचा उद्योग सुरू केला आहे.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचा फ्लेवर तयार करून त्यापासून या शेवया तयार केल्या जातात. 

या शेवयामध्ये शेवगा, फ्लेवर, पालक, मेथी, नाचणी, सोयाबीन, गहु, सोजीरवा चॉकलेट, बटरस्कॉच, यांचा समावेश आहे. 

यासोबतच व्हेनीला, पाइनापल, केवी, दूध, बाजरी, मँगो, ब्लॅकओट्स, शुगर फ्री नुडल्स, रोस्टेड आणि मिक्स फ्लेवरमध्ये शेवया उपलब्ध आहेत.

या शेवयांची किंमत 70 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत आहे. 

या शेवयाला आता मागणी वाढू लागली आहे. 

धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, हैद्राबाद तसेच पुण्याच्या काही मॉलमध्ये या शेवयाची विक्री होत आहे.

शेवयामधून वर्षाकाठी या महिलांना काही लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत.