शेतीचा शोध महिलांनीच लावल्याचं सांगितलं जातं. आता याच महिला शेतीतून लाखोंची कमाई करत आहेत.
बीडमधील शेतकरी महिलेने आपल्या शेतीत अनोखा प्रयोग केला आहे.
आष्टी तालुक्यातील केळसावंगी सारख्या दूर्गम भागात सफरचंदाची शेती केली आहे.
पती निधनानंतर खचून न जाता विजया घुले यांनी कुटुंबाची आणि पारंपरिक शेतीची सूत्रे हाती घेतली.
विजया यांनी शेती करून एका मुलाला इंजिनिअर तर दुसऱ्याला शिक्षक बनवले.
विजया यांनी हिमाचल प्रदेशातून उष्ण प्रदेशात येणारी हरमन जातीची सफरचंदाची रोपे आणली.
आपल्या एक एकर क्षेत्रात 12 बाय 10 अंतरावर 240 रोपांची लागवड केली.
एक एकर क्षेत्रावर सफरचंदाच्या लागवडीसाठी 60 हजार रुपये खर्च आला.
आता तीन वर्षानंतर या झाडांना फळं आली असून प्रत्येक झाडाला 40 ते 50 सफरचंद आहेत.
आतापर्यंत 5 टन फळांची तोडणी झाली असून संपूर्ण बागेमध्ये 20 टन सफरचंद निघण्याचा अंदाज आहे.
सफरचंदाच्या शेतीतून 4 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा आहे.
बीड सारख्या दुष्काळी भागात शेतकरी महिलेने केलेला प्रयोग पाहण्यासाठी लोक येत आहेत.