काही क्षणात द्राक्ष बाग झाली भुईसपाट! शेतकऱ्याचं लाखोंच नुकसान
दुर्घटनेत महादेव रंगराव जगताप यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.
हाता तोंडाशी आलेली बाग कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
आठ दहा दिवसांत द्राक्ष बाग काढणी सुरू होणार होती.
अतिशय परिश्रम घेऊन जगताप यांनी यावर्षी चांगली बाग आणली होती.
सकाळी साडेसातच्या दरम्यान जोरदार वाऱ्याने बागेच्या आत शिरकाव केला व बघता बघता बाग एका झपाट्यात खाली कोसळली.
बँकेतून सात लाख रुपये असे कर्ज काढून द्राक्ष बाग लावली होती.
बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागले.