दिरानं वहिणीसोबत थाटला संसार

भारतीय संस्कृतमध्ये लग्न हा अतिशय महत्वाचा संस्कार समजला जातो. 

एकदा लग्न झालं की सात जन्माचे नाते दृढ होत असल्याची मान्यता आहे. 

भारतीय समाजात पती निधनानंतर महिलांना विधवेचं जीवन जगावं लागतं. 

जालन्यातील तरुणानं प्रत्यक्ष कृतीतून नवा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे. 

घनसावंगी तालुक्यातील खलापूरच्या नितीन मरकड याचं विवाहानंतर वर्षभरातच निधन झालं.

नितीनच्या निधनामुळं लहान बाळ आणि पत्नी पूजा यांच्यावरील छत्र हरपलं. 

नितीनचा लहान भाऊ सचिननं वहिनी व मुलगा जयराज यांची जबाबदारी घेण्याचं ठरवलं. 

समाज मान्यतेच्या भीतीनं पुनर्विवाह करणं शक्य नसल्यानं 6 वर्षांचा काळ लोटला. 

शेवटी नातलग आणि कुटुंबीयांनी पुढाकार घेत सचिन व पूजा यांच्या लग्नाचा निर्णय घेतला.

सर्वांच्या सहमतीनं चतुर्थीच्या मुहूर्तावर माळाच्या गणपती मंदिरात दोघांचा विवाह झाला. 

आख्खं गावच आहे 'तेंडल्या'चं फॅन!

Click Here