दीक्षाभूमी नागपूर ठरलीच नव्हती, पण.. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.

रक्ताचा एक थेंबही न सांडता नागपुरात ही सर्वात मोठी धम्मक्रांती झाल्याचं सांगतिलं जातं. 

परंतु, दीक्षाभूमी म्हणून सुरुवातीला नागपूरचं नाव निश्चित झालं नव्हतं. 

वाराणसी येथील सारनथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत होतं. 

बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती होती. 

धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी नागपूरचे नाव सुचवलं. 

नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती आणि ते पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात.

धम्मदीक्षा समारंभ नागपुरात झाल्यास मोठ्या संख्येने लोक जमतील असा अंदाज होता.

नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होतं. 

नागपुरातील बौध्दजण समितीने या सोहळ्याचा संपूर्ण खर्च आणि जवाबदारी घेतली. 

गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे बाबासाहेबांनी नागपूर हे ठिकाण निश्चित केलं. 

पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी बाबासाहेबांना बौद्ध धम्म दीक्षा दिली.

आंबेडकरांनी 5 लाखापेक्षा अधिक बांधवाना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्म दीक्षा दिली. 

14 एप्रिल हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणूनच ओळखला जातो. 

चक्क रिक्षावर साकारली दीक्षाभूमी!

Click Here