इतके स्वस्त चप्पल आणि शूज कुठंच मिळणार नाहीत

 पुणे शहरात तरुणींचे शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून फर्ग्युसन रोड म्हणजेच एफसी रोडची ओळख आहे. याच एफसी रोडवर तुम्हाला स्वस्तामध्ये या वस्तू मिळतील.

एफसी रोडवरच्या शिरोळे मार्केट आणि केसरिया मार्केटमध्ये विविध प्रकारच्या सँडल्स, चप्पल उपलब्ध आहेत. या खरेदीसाठी तुम्हाला या मार्केटच्या आतल्या भागात जावं लागेल.

या मार्केटमध्ये तुम्हाला चक्क 100 रुपयांपासून विविध प्रकारच्या सँडल मिळू शकतात. याच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्ये देखील फरक आहे.

सध्या तरुणी वेगवेगळ्या प्रकारच्या सँडल्स आणि शूज वापरतात. ते सर्व प्रकार इथं तुम्हाला पाहाता येतील.

या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या सँडल्सच्या कॉम्बो ऑफर देखील उपलब्ध आहेत.

399 रुपयांमध्ये तीन सँडल किंवा 999 रुपयांमध्ये सँडल, बेली शूज आणि स्पोर्ट शूजचे कॉम्बिनेशन इथं खरेदी करता येते.