150 पेक्षा जास्त ब्लाऊजचे पॅटर्न ‘इथं’ करा खरेदी
साडी, लेहेंगा, स्कर्ट हे सर्व प्रकार महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.
या कपड्यांवर परिधान करण्यासाठी मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज लागतात.
मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक ब्लाऊजच कुठे खरेदी करता येतील याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
श्वेता इनामदार या मुंबईकर महिलेच्या शॉपमध्ये 150 पेक्षा जास्त ब्लाऊज मिळतात.
दादरमधील रानडे रोड जवळ असलेल्या या दुकानात ब्लाऊजच्या अनेक व्हरायटी मिळतात.
गझी सिल्क, बनारस सिल्क, 2 डी पॅटर्न, इंडो वेस्टर्ण, सिंगलेट असे 150 पेक्षा जास्त प्रकार या दुकानात उपलब्ध आहेत.
येथे 350 रुपयांपासून ते 4 हजार रुपये तसेच हेवी लेहेंग्यावरचे ब्लाऊज डिझाईन करून मिळतात.