'या' मार्केटमध्ये करा जगभरातील मसाल्यांची स्वस्त खरेदी!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जगभरातील मसाले स्वस्त मिळणारं एक मार्केट आहे.
अगदी कोरोनाच्या काळातही हे मार्केट अखंड सुरू होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC मार्केट ही नवी मुंबईतील वाशीची वेगळी ओळख आहे.
वाशी, तुर्भे, सानपाडा स्थानकापासून हे मार्केट जवळ आहे.
या बाजारात हे मसाला मार्केट गेल्या 32 वर्षापासून सुरू आहे.
तब्बल दोनशेपेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी मसाल्याची दुकानं आहेत.
काश्मीरी मिरची, मिरची, धने, हळद, दालचिनी, खसखस, लवंग, वेलची, जायफळ
खडा मसाला, जिरे, मोहरी, खोबर, चिंच यासह अनेक प्रकारचे मसाले इथं मिळतात.
हे आशिया खंडातील सर्वात मोठं मार्केट आहे.
यामधील मसाला मार्केटला यंदा 32 वर्ष पूर्ण झाली आहेत.
कोरोना काळात सरकारच्या विनंतीवरुन येथील कामगारांनी जीव धोक्यात घालून काम केलं होतं.
सर्व प्रकारचे मसाले होलसेल भावात या मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.