काळे रत्न धारण केल्यानं नशीब बदलतं का?

तुम्ही रोज वापरत असलेल्या रत्नाचेही अनेक प्रकार आहेत. त्यापासून वेगवेगळे फायदे देखील होतात. 

पण, कोणते रत्न धारण धारण करावीत आणि त्याची निवड कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. 

84 रत्नांपैकी 9 मुख्य रत्ने मानली जातात. यामध्ये मोती, पन्ना, प्रवाळ, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, वैदुर्य यांचा समावेश आहे. 

आज आम्ही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणजेच काळ्या रंगाच्या रत्नांबद्दल सांगणार आहोत.

ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कुंडलीत राहू आणि केतू पीडित असतील तर त्याने खरा दगड धारण करावा. 

यामुळे राहू केतू शांत राहतो आणि जीवनात सुख-समृद्धीचा संचार होतो. हे रत्न धारण करणे फायदेशीर असते. 

 तुमचे मन स्वास्थ्य कोणत्यातरी बाह्य नकारात्मक गोष्टींमुळे हरवले आहे असे वाटत असेल तर हे रत्न जरूर वापरावे. 

नकारात्मक उर्जा दूर करून सकारात्मक उर्जा प्रवाहित करणारे आणि नकारात्मक गोष्टीं पासून बचाव करणारे हे उपरत्न कोणीही वापरण्यास हरकत नाही.

नजर लागणे – घात-अपघात  अशा गोष्टीं पासून रक्षण होते. 

दुर्घटने पासून रक्षण करणे हे या रत्नाचे मुख्य कार्य आहे. सर्व त्रास कष्ट स्वत: घेण्याची याची क्षमता आहे. 

टुर्मेलीन चा मोठा खडा कुठलीही ऋण उर्जा शोषून घेत असल्याने ऑफीसातल्या दर्शनी भागात किंवा घरात पहिल्या खोलीत दिसेल असा ठेवल्यास याचा नक्कीच फायदा होतो. 

शांतीदूत असलेला हा खडा सर्व शरीर शुद्धी करून ताणतणाव नाहीसे करतो.

सर्व प्रकारचे कोड, त्रिदोष, पोटाचे रोग, ज्वर, श्वास, क्षय, प्रमेह, वीर्यदोष,  निवारणासाठी मदत करतो, असं राजेश जोशी यांनी सांगितले.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

श्रावणात तुळशीचे हे नियम पाळा 

Click Here