इथं एका टांगेत ओलांडता येते नदी

निसर्गातील अनेक घटना किंवा ठिकाणं आश्चर्यचकित करणाऱ्या किंवा चमत्कारिक वाटाव्यात अशा असतात. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणाऱ्या मुळा नदीवरील सांडवा असाच एक आहे. 

शिसवद गावातील एक अनोखे दुर्लक्षित निसर्गशिल्प म्हणूनच सांडव्याची ओळख आहे. 

हरिचंद्रगडाकडून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी खडकाच्या पोटातून वाहते. 

या ठिकाणी नदी एका टांगेत ओलांडता येते अशी निसर्गनिर्मित जागा असून त्याला सांडवा म्हणतात. 

शिसवदमधील याच सांडव्याला अस्वल उडी, नडाग उडी म्हणून देखील ओळखलं जातं. 

मुळा नदीचा प्रवाह या ठिकाणी 4 फुट रुंद आणि 50 फूट खोलीच्या सांडव्यातूनच प्रवाहित होतो. 

या परिसरातील खोलगट भूभागामुळे मुळा नदी प्रचंड वेग धारण करते व या सांडव्यातून प्रवाहित होते. 

नदीचे पाणी खडकांवर आदळल्याने येथे रांजणखळगे तयार झाले असून हे शिल्प कोरीव असल्यासारखे भासतात. 

पावसाळ्यात मुळा नदीला पूर आल्यावर राजूरहून पाचनई, पेठेचीवाडी, खडकी, हरिचंद्रगडाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग होता. 

कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

Click Here