काय आहेत हिंदू धर्मातील 16 संस्कार?

भारताच्या प्राचीन शिक्षणपद्धतीमध्ये गुरूकुल पद्धतीचा समावेश होतो. 

 या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना 64 कलांचं ज्ञान दिलं जात असे.

आता बहुतेकांना या 64 कला त्याचबरोबर आयुष्यातील महत्त्वाचे असे 16 संस्कार याबाबत माहिती नाही. 

 या महत्त्वाच्या पैलूची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न कोल्हापूरमध्ये करण्यात येत आहे.

कोल्हापुरातील कणेरी मठमध्ये  सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. 

हा महोत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

या महोत्सवात आकाश, पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी या पाच तत्त्वांवर आधारित दालनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली आहे.

या महोत्सवात आदर्श गुरुकुल पद्धतीची माहिती मुर्ती आणि पुतळ्यांच्या रुपात दाखवण्यात आलीय.

त्याचबरोबर मनुष्याच्या आयुष्यात महत्त्वाचे असे 16 संस्कार आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. 

ज्यांचा आजकाल विसर पडत चालला आहे. 

अशा या संस्कारांचे आणि गुरुकुलात शिकवल्या जाणाऱ्या कला आणि विद्यांचे दर्शन या दालनात घडविण्यात आले आहे.

काय आहेत 16 संस्कार?
1) गर्भाधान, 2) पुंसावन/ओटी भरणे, 3) सिमंतनयन, 4) जातकर्म/प्रसुती, 5) नामकरण/बारसे, 

6) निष्क्रमण, 7) अन्नप्राशन, 8) चुडाकर्म/जावळ, 9) विद्यारंभ, 10) कर्णभेद/कान टोचणे

11) उपनयन/मुंज, 12) वेदाभ्यास, 13) केशांनत, 14) समावर्धन, 15) विवाह, 16) अंत्येष्टी