पतीच्या अकाली निधनानंतर महिलांना मोठा धक्का असतो पण त्यातूनही अनेकजणी सावरतात.
काही महिला या आपल्या जिद्दीनं आणि कष्टानं समाजापुढं एक वेगळा आदर्श प्रस्थापित करतात.
असाच आदर्श वर्ध्यातील यशोदा नारायण ढोबळे यांनी समाजापुढं ठेवलाय.
यशोदा ढोबळे यांचे पती नारायणराव हे रिक्षा चालवून कुटूंब सांभाळत होते.
2000 साली पतींचं निधन झालं आणि संसाराची सूत्रं यशोदाबाईंना घ्यावी लागली.
सहावी शिक्षण झालेल्या यशोदाबाईंनी झुणका भाकर केंद्र सुरू केलं.
झुणका भाकर विकून त्यांनी कुटुंबाला सावरत मुलांची शिक्षणंही केली आहेत.
2005 मध्ये 5 रुपयांना मिळणारी झुणका भाकर आता 40 रुपयांना झाली आहे.
यशोदाबाई या सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झुणका भाकर केंद्र चालवतात.
सध्या यशोदाबाईंचं वय 64 वर्ष असून त्या इतर महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत.
Click Here