विविध ऐतिहासिक स्थळांमुळे वर्धा जिल्ह्याची साता समुद्रापार विशेष ओळख आहे.
वर्ध्यात येणारे पर्यटक येथील प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थांची चवही चाखून घेत असतात.
वर्धा शहरातील मगनवाडी एमगिरी रोडवर थालीपीठ कॉर्नर आहे.
येथे मिळणाऱ्या 16 प्रकारच्या थालीपीठ आणि पराठ्यांचे अनेक दिग्गज चाहते आहेत.
खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह अनेकांनी येथील थालीपीठावर ताव मारलाय.
उच्च शिक्षित गृहिणी वैशाली अनिल भगत या थालीपीठ कॉर्नरच्या संचालिका आहेत.
वैशाली यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन खाजगी नोकरी देखील केली.
नागपुरातील कपड्यांचा व्यवसाय बंद करून त्यांनी थालीपीठ कॉर्नर सुरू केलं.
नवनवीन प्रयोग केल्याने आता त्यांच्याकडे 16 प्रकारचे पराठे आणि थालीपीठ मिळतात.
वैशाली यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत थालीपीठ विक्रीतून सात ते आठ हजारांची मिळकत होते.
पाकिस्तानातील देवी सोलापुरात!
Click Here