महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण व्हावे, असा विचार होता.
हाच विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी वर्ध्यातील ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र प्रयत्न करत आहे.
दत्तापूर येथील केंद्राच्या वतीने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्यात येत आहेत.
येथील हात कागद उद्योग कचऱ्यातून कलेचा प्रेरणादायी संदेश देतो आहे.
शाळा, शासकीय कार्यालयातून रद्दी, मार्केटमधून वेस्ट पोती गोळा केली जातात.
रद्दी एका मशीनमध्ये टाकून त्याच्यावर कागद बनवण्याची प्राथमिक प्रक्रिया केली जाते.
कचऱ्यापासून केंद्राच्या वतीने हातकागद आणि शोभेच्या वस्तू बनवल्या जातात
कागदी पिशवी, शोभेचे घर, पेन पॉट, डस्टबिन, फाईल स्टँड, फुलदाणी आदी वस्तूंचा समावेश आहे.
लेटर पॅड, फोटोफ्रेमसह सर्व वस्तूंची विक्रीही केंद्राच्या वतीने केली जाते.
ग्रामोपयोगी केंद्राच्या वतीने अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे.
बैलगाडी अपघातानं घडवला लेखक!
Click Here