नुकताच दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळवलंय.
वर्धा जिल्ह्यातील सृष्टी किशोरराव बनकर सिकलसेल सारख्या आजाराशी झुंज देत आहे.
तरीही तिनं जिद्दीनं अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवले आहेत.
सृष्टीचा हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी असून तिचं इंजिनिअर बनण्यााचं स्वप्न आहे.
सृष्टीचे वडील किशोरराव बनकर यांचं किराना दुकान आहे तर आई शुभांगी बनकर गृहिणी आहेत.
सर्वसाधारण कुटुंबातील सृष्टीला लहानपणापासून सिकलसेल नावाचा आजार आहे.
दहावीची परीक्षा देत असताना तब्येतीच्या तक्रारींमुळे वारंवार अभ्यासात अडथळे आले.
सृष्टी शाळा नियमित करू शकली नाही आणि शिकवणी वर्गालाही सतत सुट्ट्या पडत होत्या.
दहावीच्या परीक्षेच्या आधीही सृष्टीला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं.
तरीही सृष्टीने मिळवलेले यश कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारं आहे.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here