पाण्यावर साकारली महामानवाची रांगोळी!

आपल्या नावाची दखल जागतिक पातळीवर घेतली जावी ही अनेकांची इच्छा असते. 

पण, यासाठी लागणारी मेहनत आणि जिद्द काही जणांमध्येच आढळते. 

वर्धा जिल्ह्यातील एका तरूणीनं रांगोळी कलेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे.

पूनम दीपक तरोणे (केने) असं या विक्रम करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. 

पूनम यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक पोट्रेट रांगोळी पाण्यावर साकारलीय.

अवघ्या 11 मिनिटं 32 सेकंद आणि 98 मिली सेंकदमध्ये त्यांनी ही पोट्रेट रांगोळी पाण्यावर साकारलीय. 

कोणतेही स्केच किंवा टूलचा वापर न करता त्यांनी ही रांगोळी काढलीय. 

पूनम यांच्या रांगोळीची दखल एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनंही घेतली आहे.

पूनम यांनी यापूर्वी महात्मा गांधी यांचं पेंटिंग 8 मिनिटांमध्ये साकारत इंडिया बुकमध्ये नाव नोंदवले होतं.

आंतरराष्ट्रीय युथ स्किल अवॉर्ड, आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार (स्पेन) इथंही पूनमला यश मिळवलंय. 

विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!

Click Here