वृक्ष संवर्धनाचा वसा घेऊन प्रयत्न केल्यास ओसाड माळावरही हरित क्रांती होऊ शकते.
आपल्या कृतीतून वर्ध्यातील मुरलीधर बेलखोडे यांनी वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
सन 2000 पर्यंत वर्ध्यातील आयटीआय टेकडी परिसर ओसाड माळरान होता.
याच आयटीआय टेकडीवर मुरलीधर बेलखोडे यांनी पहिलं रोपटं लावलं.
आता निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने परिसरात घनदाट झाडी तयार झाली आहे.
शुद्ध प्राणवायू मिळत असल्यानं परिसराला 'ऑक्सिजन पार्क' म्हणून ओळखळं जातंय.
जागतिक पातळीवर योगदान देणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या नावानं बागा तयार करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक बाग आणि औषधी उपयोगात येणाऱ्या झाडांवर बारकोड लावण्यात आला आहे.
बारकोड स्कॅन केल्यास बाग व झाडाची संपूर्ण माहिती मिळते.
विशेष म्हणजे ही माहिती इंग्रजी, मराठी व हिंदी अशा तिन्ही भाषांत उपलब्ध आहे.
15 लाख झाडं लावणारा ट्री मॅन!
Click Here