गडकरींच्या भाषणानं गृहिणी झाली उद्योजक!

अनेक सुशिक्षित महिला आता उद्योग आणि व्यवसायाकडे वळत आहेत. 

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (शामजी पंत) येथील सुशिक्षित गृहिणी आता उद्योजक झाली आहे. 

निकिता मयूर वानखेडे यांनी सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक भाषण ऐकलं. 

आपण जे काही करावं ते पर्यावरण पूरक आणि ग्रामीण महिलांना रोजगार देणार असावं असं त्यांना वाटलं.

निकिता यांनी बांबू रिसर्च सेंटर चंद्रपूर येथे भेट देऊन माहिती गोळा करायला सुरुवात केली. 

गडकरींच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्यानं निकिता यांनी चक्क बांबू हस्तकलेचा लघु उद्योग सुरू केला. 

मागील 3 महिन्यातच बांबू हस्तकलेच्या 40 ते 50 प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत. 

आकाशकंदील, चहाकप, मोबाईल स्टॅण्ड, फुलदाणी,  मोबाईल स्पीकर स्टॅण्ड, फ्रुट स्टॅण्ड आदी वस्तू बनवतात. 

निकिता या बांबू पासून बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. 

आता काही महिला निकिता यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. 

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दंगल गर्ल मैदानात!

Click Here