'या' गावात फुकटात मिळतं दळण, पण..

खेड्या-पाड्यात ग्रामपंचायतीचा कर गोळा करणं म्हणजे तसं अवघडच काम असतं. 

वर्धा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीनं कर संकलनासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. 

हिंगणघाट तालुक्यातील राळेगाव मार्गावर मनसावळी हे 1200 लोकसंख्येचं गाव आहे. 

ग्रामपंचायत मनसावळीने ग्रामपंचायत कार्यालयातच 1 एप्रिल 2023 ला एक चक्की उभारली. 

पिठाच्या चिक्कीतून गावकऱ्यांना ग्रामपंचायत मार्फत मोफत दळण दळून दिलं जातंय. 

पण मोफत दळण मिळवण्यासाठी या गावत अनोखी अट ठेवण्यात आली आहे.

ज्या नागरिकानं 100 टक्के कर भरणा केला आहे, त्यालाच ही मोफत दळणाची सुविधा उपलब्ध आहे. 

'कर भरा आणि एक वर्ष मोफत दळण दळून घ्या' या संकल्पनेमुळं गावात कर गोळा होत आहे. 

ग्रामपंचयातच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्सूर्त पाठिंबा मिळत असून कर संकलन वाढले आहे. 

या उपक्रमातून आदर्श घेऊन इतर ग्रामपंचायतीही कर भरण्यासाठी नवनव्या संकल्पना राबवू शकतात.

आनंद महिंद्रांना भुरळ घालणारा इडली किंग!

Click Here