उन्हाळ्यात वड्या, पापड, शेवया तसेच विविध वाळवणीचे पदार्थ बनविले जातात.
विदर्भातही उन्हाळ्यामध्ये सरगुंडे हा ठेवणीचा पदार्थ बनवला जातो.
सरगुंडे हे शेवया किंवा नूडल्स प्रमाणे दिसतात म्हणून त्याला पारंपरिक नूडल्सही म्हणू शकतो.
सरगुंडे हे सुद्धा गव्हाच्या पिठापासूनच बनवले जात असून त्याची एक पद्धत आहे.
एक गुळगुळीत काडी किंवा सर याला गव्हाची कणीक विशिष्ट पद्धतीनं गुंडाळतात.
सर पूर्ण भरल्यानंतर त्याला धूळ बसणार नाही अशाप्रकारे उन्हात वाळवतात.
ओलसर असतानाच सर काढून घेतली जाते जेणेकरून बारीक तुकडे होणार नाहीत.
गव्हाची पोळी खाण्यास कंटाळा करणारे चिमुकले हा पदार्थ मोठया आवडीने खातात.
विदर्भात हे सरगुंडे उन्हाळ्यात आंब्याचा रस, पन्हं या गोड पदार्थांसोबत घरोघरी खाल्ले जातात.
मॅगी मसाला आणि इतर मसाले घालून फोडणी देऊनही चवदार सरगुंडे घरच्या घरी बनविता येतात.
आनंद महिंद्रांना भुरळ घालणारा इडली किंग!
Click Here