चवीला आंबट असणारी अंबाडीची भाजी आपल्या सर्वांना परिचित असेल.
विदर्भातील लोक मोठ्या संख्येने या अंबाडीच्या भाजीला पसंती देतात.
विशेषत: पावसाळ्यात उगवणारी ही भाजी महिला शेतात जावून आवर्जून आणतात.
विदर्भात अंबाडीच्या भाजीपासून भाजी, भाकरी, चटणी, पराठे अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले जातात.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत देखील हेल्दी आणि चविष्ट अशी ही भाजी आवडीची आहे.
भाजीच नाही तर या भाजीपासून बनलेल्या भाकरी देखील मोठ्या चवीने खातात.
अंबाडीची भाकरी बनवण्यासाठी केवळ तीन साहित्याची आवश्यकता आहे.
अंबाडीच्या भाजीचे पाने, ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ या साहित्यावरच अंबाडीची भाकरी केली जाते.
अंबाडीच्या भाकरीत लाल मिरची आणि लसणचा ठेचा ऍड केला तर भाकरी चटपटीत होईल.
अंबाडी भाजीची भाकरी बनवण्याची रेसिपी खूप सोपी असून तुम्हीही घरात नक्की ट्राय करू शकता.
कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती
Click Here