निसर्ग आणि मानवी हस्तक्षेपामुळं अलिकडच्या काळात वन्यजीवांना धोका वाढलाय.
वर्ध्यातील करुणाश्रम अपघातग्रस्त वन्यजीवांवर उपचार करण्याचं काम करतंय.
पिपरी परिसरातील करुणाश्रमात अपघातग्रस्त, बेवारस, आजारी वन्यजीवांची काळजी घेतली जाते.
दीड वर्षांपूर्वी करुणाश्रमात दाखल झालेला बिबट्याचा बछडा आता 17 महिन्यांचा झाला आहे.
वाशिम वन विभागाला आईपासून दुरावलेला सहा दिवसांचा बछडा मरणासन्न अवस्थेत आढळला होता.
बछड्याला वर्ध्यातील करुणाश्रमात आणल्यावर त्याचं 'जग्गू' असं नामकरण करण्यात आलं.
जग्गूला निमोनिया झाला असल्याने त्याच्यावर 15 दिवस उपचार करण्यात आले.
निमोनियातून बरा होताच जग्गूला 'एन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज' हा आजार असल्याचे कळलं.
करुणाश्रमात जग्गूवर तज्ज्ञांनी योग्य उपचार केल्याने तो आता स्वत:च्या डोळ्यांनी पाहू शकतोय.
17 महिन्यांचा जग्गू हा करुणाश्रम कुटुंबातील एक सदस्य असून तो आता मनसोक्त खेळतोय.
Click Here