40 गावातील शेतीचं झालं तळं

शेतीसाठी पाणीपुरवठ्याची सोय गरजेचीच असते म्हणून विदर्भातील लाल नाला प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला गेला. 

लाल नाला प्रकल्पामुळे चंद्रपूर आणि परिसरातील शेतीला फायदा झाला. 

यंदा विदर्भासह वर्ध्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून लाल नाला ओव्हर फ्लो झाला आहे. 

पाणीपातळी वाढल्याने रात्रीच दरवाजे उघडण्यात आले असून शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली. 

या प्रकल्पाचा वर्धा जिल्ह्यातील 40 गावच्या शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. 

दरवर्षी लाल नाला ओव्हर फ्लो होऊन शेतीला तळ्याचं स्वरुप येत असून खरीपाची पिकं पाण्यात जात आहेत.

पार्डी, हेटीसावंगी, चीजघाट, लाडकी, मानोरा, काजळसरा, नंदुरी यासह अनेक गावांना फटका बसला आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून नुकसान होत असल्याने हतबल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

आम्ही शेती कशी करावी आणि जगावं कसं? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. 

लाल नाला प्रकल्पामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. 

कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

Click Here