तुमच्या हातातील कला, मनातील सकारात्मकता आणि जिद्द, चिकाटी तुम्हाला कधी उपाशी ठेवत नाही.
याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या 46 वर्षीय कुक राजू बावणे यांना आला आहे.
राजू यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून मुंबईत हॉटेलमध्ये नोकरी केली.
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाला आणि नोकरी गेली.
त्या काळात आईलाही कॅन्सर आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक समस्या समोर होत्या.
तेव्हा राजू यांना कलेनं सावरलं. नागपूर वर्धा रोडवर खडकी येथे बटाटा वडा विकण्यास सुरुवात केली.
या बटाटा वड्याची चव अनेकांना आवडू लागली आणि वडा खाण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली.
बावणे यांच्या दुकानातील बटाटावडा आणि डोसा यांना चांगली मागणी आहे.
आता बावणे यांनी मुंबईला परतण्याचा विचारच सोडला असून व्यवसाय कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
विशेष म्हणजे राजू यांनी विधवा महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!
Click Here